---Advertisement---

काँग्रेसला मोठा धक्का, पद्माकर वळवी यांचा भाजपमध्ये प्रवेश

---Advertisement---

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यात  भाजपने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस नेते पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.  आदिवासीबहुल नंदुरबार  जिल्ह्यात पद्माकर वळवी यांची मजबूत पकड आहे. मंगळवारी पद्माकर यांनी मुंबईत बावन कुळे यांची भेट घेतली आणि बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला.

नंदुरबार जिल्ह्यातून तीन वेळा काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. उत्तर महाराष्ट्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे. यापूर्वीच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री होते. राहुल गांधी यांची भारत जोडो, न्याय यात्रा मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यात पोहोचली. पद्माकर वळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने नंदुरबारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment