---Advertisement---

काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याच्या पत्नीचा भाजपमध्ये प्रवेश !

---Advertisement---

झारखंडमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा यांच्या पत्नी, खासदार गीता कोडा यांनी आज २६ रोजी भाजपमध्ये प्रवेश केला. झारखंडमधील रांची येथील भाजप कार्यालयात राज्याचे भाजप प्रमुख बाबूलाल मरांडी यांच्या उपस्थितीत गीता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्‍याचे वृत्त समोर आहे.

गीता कोडा या झारखंडमधील सिंहभूम मतदारसंघाच्‍या खासदार आहेत. आज २६ रोजी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गीता कोडा झारखंडमधील काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी युतीवर नाराज आहेत, असे ‘एएनआय’ने सूत्रांच्‍या हवाल्‍याने म्‍हटलं आहे.

त्‍यांचा भाजपमधील प्रवेश लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. पत्नी गीता कोडा यांच्यासह मधु कोडा हे देखील भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत, असे वृत्त देखील माध्यमांकडून देण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment