---Advertisement---

काँग्रेस आमदाराने मोठ्या हौसेने चालवली बस पण, वाहनांना उडविले

---Advertisement---

बंगळुरु : कर्नाटकात सिद्धरामय्या सरकारने महिलांसाठी मोफत बससेवा ‘शक्ती योजना’ सुरू केली आहे. यावेळी काँग्रेसच्या आमदार रूपकला यांनी स्वत: महिलांना मोफत बस पासचे वाटप केले. यावेळी त्यांनी स्वत: बस चालवण्याचा स्टंट करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो स्टंट त्यांच्याच अंगाशी आला. कारण चुकून पुढचा गिअर टाकण्याऐवजी रिव्हर्स गिअर टाकल्याने बस मागे पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडकली. यामुळे अनेक वाहनांचं नुकसान झालं आहे.

सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आमदार रूपकला चालकाच्या मदतीने बस चालवत असल्याचं पाहायला मिळत आहे. बसमध्ये अनेक महिला प्रवासी आहेत. याच दरम्यान रूपकला यांनी चुकून रिव्हर्स गिअर टाकल्याने बस मागे उभ्या असलेल्या वाहनांना धडकली. यानंतर शेजारी उभ्या असलेल्या चालकाने स्टेअरिंग स्वत:च्या हातात घेतलं.

कर्नाटकातीलकाँग्रेस सरकारने पाच गोष्टींपैकी एक असलेली ’शक्ती’ योजना लागू केल्यानंतर रविवारपासून महिलांना सरकारी बसमधून मोफत प्रवास करता येणार आहे. अधिकार्‍यांनी सांगितले की, या मोफत प्रवास सुविधेचा ४१.८ लाखांहून अधिक महिलांना फायदा होईल आणि वार्षिक ४,०५१.५६ कोटी रुपये खर्च होतील. राज्यातील महिलांसाठी ही योजना रविवारी दुपारी एक वाजल्यापासून राज्याच्या हद्दीत लागू झाली आहे.

 

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment