नागपूर : महाविकास आघाडीची नागपूरात आज दुसरी वज्रमुठ सभा पार पडणार आहे. ही सभा सुरू होण्यापूर्वीच चर्चेत आली आहे. मविआतल्या एका प्रमुख नेत्याच्या अनुपस्थितीमुळे या चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेला नाना पटोले गैरहजर होते. त्यामुळे मविआमध्ये सगळं काही अलबेल नाही, अशा चर्चा सुरू होत्या. आता आज होणाऱ्या नागपूरच्या सभेत अशोक चव्हाण अनुपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या नाराजीच्या चर्चांनी जोर धरला आहे.
कोणता नेता मारणार दांडी?
अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. आपल्या ट्वीटमध्ये चव्हाण म्हणतात, “नांदेड जिल्ह्यातील स्थानिक निवडणुकांची पूर्वतयारी सुरू असल्याने आज नागपूर येथील महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला उपस्थित राहणे शक्य होणार नाही. आघाडीच्या प्रमुख नेत्यांना मी याबाबत पूर्वकल्पना दिली आहे. सभेला माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा.” असं अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.