मुंबई : मागच्या वर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर मागच्याच महिन्यात राष्ट्रवादीत बंड झालं. आता काँग्रेसमध्ये फूट पडू शकते, असा दावा शिंदे गटातल्या खासदाराने केला आहे. काँग्रेसमधल्या मोठ्या गटामध्ये धुसफूस सुरु असून हा गट महायुतीमध्ये सहभागी होऊ शकतो, असा दावाही करण्यात आला आहे.
काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांची विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड केली. त्यामुळे काँग्रेसमधला मोठा गट नाराज आहे. हा बड्या नेत्यांचा गट अस्वस्थ असल्याने ते लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहेत. हे नेते महायुतीमध्ये सहभागी होतील, असा दावा बुलढाणा जिल्ह्याचे शिंदे गटाचे खासदार प्रतापवार जाधव यांनी हा दावा केलाय.
काँग्रेसचे अनेक नेते आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. त्यामध्ये आमदारांचाही समावेश आहे. एक मोठा गट महायुतीमध्ये सहभागी होईल. असा दावा प्रतापराव जाधवांनी केला आहे.