काकडीचे थालीपीठ रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । २८ सप्टेंबर २०२३। थालीपीठ जवळपास सगळ्यांच्या आवडीचा विषय. कांद्याचे थालीपीठ, उपवासाला बनवले जातात ते साबुदाण्याचे थालीपीठ, पण तुम्ही कधी काकडीचे थालीपीठ ट्राय केलं आहे का? काकडीचे थालीपीठ घरी सोप्प्या पद्धतीने बनवता येते. काकडीचे थालीपीठ घरी कसे बनवायचे हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य 
काकडीचा किस, दाण्याचा कूट, गव्हाचे पीठ,चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, चवीपुरते मीठ, तेल
कृती 
सर्वप्रथम, 
काकडी सोलून किसावी. किसल्यावर त्यातील पाणी काढू नये. त्यात थोडे मीठ टाकावे. त्यानंतर त्यात दाण्याचा कूट, मिरचीचा ठेचा, आणि चिरलेली कोथिंबीर मिक्स करावे. या मिश्रणात गव्हाचे पीठ टाकावे आणि थोडे पाणी टाकावे. आणि डोसाच्या मिश्रणाप्रमाणे पातळ मिश्रण तयार कराव. गरम तव्यावर आवडीनुसार तेल किंवा तूप टाकावे आणि त्यावर हे काकडीचे मिश्रण डोसासारखे पसरावे. मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी थालीपीठ खरपूस भाजून घ्यावे. थालीपीठ भाजताना कडेने थोडे तूप किंवा तेल सोडावे.