तरुण भारत लाईव्ह । १३ ऑक्टोबर २०२३। जेवताना आपल्याला तोंडी लावायला काहीतरी हवं असत. म्हणजे कैरीचं लोणचे, चटणी, कोशिंबीर यासारखे पदार्थ तोंडी लावायला लागतात. कोशिंबीर सारखा असाच एक पदार्थ आम्ही तुम्हाला सांगणार आहोत काकडी आणि कांद्याचं रायतं तुम्ही तोंडी लावायला करू शकता. काकडी आणि कांद्याचं रायतं घरी कस बनवलं जात हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
काकड्या, कांदे, दही, हिरव्या मिरच्या, लाल तिखट,मिरेपूड, जिरेपूड,साखर, मीठ, कोथिंबीर
कृती
सर्वप्रथम, काकड्या व कांदे सोलून घ्या आणि बारीक चिरुन घ्या. दही चांगल्याने घुसळून घ्या. मिरच्या उभ्या चिरा. दह्यात बारीक चिरलेले पदार्थ टाका. त्यात तिखट, साखर आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व एकत्रित करा आणि या मिश्रणात वरुन जिरेपूड, मिरेपूड आणि वरुन कोथिंबीर घाला. आणि सर्व्ह करा काकडी आणि कांद्याचं रायतं.