तरुण भारत लाईव्ह|५ सप्टेंबर २०२३| बर्फी हा गोड पदार्थ आहे. बऱ्याचदा आपण बाहेरून आणून खातो. पण काजू बर्फी ही घरी बनवायला सुद्धा खूप सोपी आहे. हा पदार्थ घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
काजू तुकडे, नारळ, साखर, व्हॅनिला इसेन्स, तूप
सर्वप्रथम काजू थोडावेळ पाण्यात भिजवावे. त्यानंतर नारळ खरवडून घ्यावे . नंतर काजू आणि खोबरे वाटून घ्यावे. यानंतर एका भांड्यात खोबरे, काजू आणि साखर एकत्र करा यानंतर मध्यम आचेवर हे मिश्रण ढवळत रहा यानंतर हे मिश्रण घट्ट होईल तेव्हा त्यात इसेन्स घालावा.
आणि कडेने थोडेसे तूप सोडावे. मिश्रण घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या थाळी मध्ये टाकावी त्यानंतर त्याच्या वड्या करून घ्यावा…