---Advertisement---

कामावरून परतणाऱ्या पत्नीला रस्त्यात गाठले अन् चाकूने थेट; धुळ्यातील घटना

---Advertisement---

धुळे : कौटुंबिक वादातून पतीने कामावरून परतणाऱ्या पत्नीला रस्त्यात गाठून चाकूने गळा चिरून हत्या केली. शहरातील नकाणे रोडनजीक शनिवार, १३ दुपारी ही घटना घडली. अनिता हिरामण बैसाणे (४०) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान,  पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

शहरातील फुले कॉलनीत राहणाऱ्या अनिता बैसाणे (४०) या धुणी-भांडीची कामे करायच्या. त्यांच्यात व पती हिरामण बैसाणे (४९) यांच्यात नेहमीच कौटुंबिक वाद होत होते. दरम्यान, पती हिरामण वाल्मिक बैसाणे यांनी पत्नी अनिता बैसाणे या कामावरून परतत असताना त्यांना रस्त्यात गाठून चाकूने गळा चिरून हत्या केली. या घटनेने शहरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.

 

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment