कायद्याच्या रक्षकानेच केला लव्ह जिहाद, नेमकं काय घडलं?

लखनऊ : उत्तर प्रदेशातील पिलीभीतमध्ये लव्ह जिहादचे एक प्रकरण समोर आले आहे. पिलीभीत येथे इमरान नावाच्या एका पोलिसाने धर्म आणि ओळख लपवून एका हिंदू मुलीची फसवणूक केली आहे. तसेच या व्यक्तिने त्या मुलीचे शोषण करत आपल्या मोठ्या भावासोबत अत्याचार करून तिला धर्मांतर करण्यास भाग पाडले. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा झाला आहे.

ही तरुणी मूळ उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरात राहणारी आहे. पीडितेने तिची तक्रार पिलीभीत एसपीकडे केली आहे. त्या तक्रारीत त्या तरूणीने इमरान हाल तिला तीन वर्षापुर्वी भेटल्याचे सांगितले आहे. त्यावेळी इमरानने आपली ओळख आणि धर्म लपवून आपले नाव रोहित असल्याचे सांगत. पोलिसात असल्याचे ही त्यांनी सांगितले.

तरुणीचा आरोप आहे की, भेटीनंतर काही दिवसांनी रोहितने (इमरानने) तिला प्रपोज केले आणि नंतर लग्न करण्यास सांगितले. लग्नाचे आमिष दाखवून इमरानने वेगवेगळ्या हॉटेलमध्ये तरूणीला नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार  केला. अनेकवेळा नकार दिल्यानंतरही त्याने बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले, असे पीडितेने सांगितले. अत्याचारामुळे ती गरोदर राहिल्यानंतर तिने जबरदस्तीने गर्भपातही केला असल्याचे उघड झाले आहे.
पीडितेचे म्हणणे आहे की, जेव्हा ती इमरानसोबत लग्नाबद्दल बोलायची तेव्हा तो तिच्यासोबत गैरवर्तन करायचा. वारंवार लग्नाची मागणी केल्यानंतर इमरानने तिला एका मंदिरात नेऊन लग्न केले. मात्र लग्न झाल्यानंतर त्याने तिला सोबत ठेवण्यास नकार दिला. यादरम्यान तो तिच्यावर घाणेरडे आरोपही करत असे.

इमरानच्या वागण्याला कंटाळून तिने त्याची चौकशी सुरू केल्याचे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. त्यावेळीच आरोपीचे नाव रोहित नसून इमरान मिर्झा असल्याचे पिडीतेच्या लक्षात आले. पिडीतेच्या तक्रारीनुसार इमरानने तिला मारहाण देखील करत असे आणि जर कोणाकडे तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दोन्ही भावांनी आपण पोलिसात असून कोणीही आपले नुकसान करू शकत नाही, अशी धमकी दिली. पीडितेच्या अर्जावरून कोतवाली पोलिसांनी दोन्ही हवालदार भावांविरुद्ध सामूहिक अत्याचाराचा गुन्हा झाला आहे.