---Advertisement---

कार्यकर्त्यांची पुन्हा घोषणाबाजी, सुप्रिया सुळेंनी जोडले हात, म्हणाल्या…

---Advertisement---

मुंबई :  शरद पवार यांनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पदावरून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाला संपूर्णं महाराष्ट्रातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे. तसेच शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले आहे.

त्यामध्ये काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली आहे. त्यांना विनंती करण्यासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या.  यावेळी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली त्यावेळी सुप्रिया सुळे हात जोडून विनंती करत मनधरणी करण्याचा प्रयत्न केला.

सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याशी पाच जण चर्चेला चला म्हणून सांगितले होते. मात्र, आता चर्चा नको साहेबच आम्हाला अध्यक्ष म्हणून हवे आहेत असा हट्ट करत सुप्रिया सुळे यांनाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सांगितले. त्यामुळे पदाधिकारी आपल्या मागणीवर ठाम असल्याने सुप्रिया सुळे यांनी तिथून काढता पाय घेतला.

वाय बी चव्हाण सेंटरच्या बाहेर अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले. सुप्रिया सुळे यांनीही मनधरणी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे न ऐकता आम्ही आमच्या मागणीवर ठाम असल्याचे सांगत सक्षणा सलगर, मेहबूब शेख यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेलती .

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment