---Advertisement---

कार्यकर्त्याने खांद्यावर ठेवला हात, डीके शिवकुमारने मारली थप्पड; व्हिडिओ व्हायरल

---Advertisement---

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार कार्यक्रमादरम्यान काँग्रेस कार्यकर्त्याला थप्पड मारली. डीके शिवकुमार यांनी काँग्रेस कार्यकर्त्याला थप्पड मारल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस कार्यकर्ते प्रचार कार्यक्रमादरम्यान “डीके डीके” च्या घोषणा देत असल्याचे दिसत आहे. डीके शिवकुमार पोहोचताच काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्या खांद्यावर हात ठेवताच शिवकुमार संतापले आणि त्यांनी कार्यकर्त्याला चापट मारली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा डीके शिवकुमार प्रचारासाठी आले तेव्हा काँग्रेस कार्यकर्ते “डीके डीके” च्या घोषणा देत होते. गाडीतून बाहेर आल्यावर एका कार्यकर्त्याने डीके शिवकुमार यांच्या खांद्यावर हात ठेवला. अचानक झालेल्या अयोग्य वर्तनामुळे संतप्त झालेल्या शिवकुमारने कार्यकर्त्याला चापट मारली.

भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करत काँग्रेस नेत्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी लिहिले, “कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी हावेरी येथील सावनूर शहरात निवडणूक प्रचारादरम्यान काँग्रेसचे महापालिका सदस्य अलाउद्दीन मणियार यांना थप्पड मारली. “डीकेने काँग्रेस कार्यकर्त्यावर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ नाही.”

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment