crow attack : बिबट्याने तथा हिंस्त्र प्राण्याने हल्ल्या केल्याने अनेक नागरिक जखमी झाल्याचे आपण वाचले असलेच. मात्र, ब्रिटनच्या एका शाळेत चक्क कावळ्यांनी दहशत केली आहे. येथे कावळे प्रत्येक व्यक्तीवर हल्ला करत असून विद्यार्थ्यांसह अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती शाळेने दिली आहे. तसेच शालेय प्रशासनाने सर्वांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.
शाळेकडून ईमेल करत याची माहिती देण्यात आली आहे. डुलविच येथील जेम्स अॅलन्स या गर्ल्स स्कूलमधील ही घटना आहे. शालेय प्रशासनाने आपल्या मेलमध्ये म्हटलं आहे की, शाळेतून येताना जाताना सर्व विद्यार्थ्यांनी आपली विशेष काळजी घ्यावी. कावळ्यांच्या होण्याऱ्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सावध रहावे, असं मेलमध्ये सांगण्यात आलं आहे.
कावळे हल्ला का करतायत?
परिसरात असलेल्या झाडांवर काही कावळ्यांचे घरटे आहेत. या घरट्यात त्यांची पिल्ल देखील आहेत. या पिल्लांना येणाऱ्या व्यक्ती त्रास देतील या भवनेनं कावळे नागरिकांना त्रास देतायत. कावळे येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर हल्ला करत आहेत. आपल्या चोचेने कावळे नागरिकांवर हल्ला करत त्यांना जखमी करतायत. कावळ्यांच्या हल्ल्याची लोकांमध्ये इतकी दहशत झाली आहे की, ते काही झाले तरी घरातून बाहेर पडताना कोणत्या ना कोणत्या गोष्टीने आपलं डोकं झाकतात.
आपल्या डोक्यावर छत्री, हेल्मेट किंवा अन्य कोणत्याही गोष्टीने डोक्याला सुरक्षीत आधार दिल्यावरच घराबाहेर पडतात.परिसरातील एका व्यक्तीने आपला प्रसंग सांगताना म्हटलं आहे की, माझ्यावर कावळ्यांनी फार भयंकर हल्ला केला आहे. त्यांनी माझ्या कपाळावर आणि डोक्यावर जास्त प्रमाणावर चोच मारली. टनक चोचमारूण त्यांनी डोक्याच्या त्वचेला मोठी हाणी पोहचवली.