नवी दिल्ली : नव्या संसद भवनाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्धाटन झाले. त्याचवेळी दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त उपस्थिती लावली.त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, लोकशाहीच्या पवित्र मंदिराबद्दल आणि लोकशाहीबद्दल कोणाला विरोध असता कामा नये.मुळात एका व्यक्तिला विरोध समजू शकतो पंरतू १४० कोटी जनतेला न्याय देणाऱ्या संसद भवनावर बहिष्कार घालणाऱ्यांना कावीळ झालेल्यानं सगळं पिवळं दिसतंय , असा टोला शिंदेंनी विरोधकांवर लगावला.
तसेच हा बहिष्कार घालण्याचा प्रकार दुर्देवी आहे. याआधी ही पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या हस्ते उद्धाटने झालेली आहेत. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात सर्वानी सहभागी व्हायला हवं होत. पण स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम केला म्हणून विरोधकांना वावड आहे का? , असा सवाल शिंदेंनी विरोधकांना विचारला.