काश्मीर कुणाचा? पाकिस्तानी व्यक्तीचे उत्तर ऐकून तुमचे हृदय पिळवटून जाईल; पहा व्हिडिओ

काश्मीरला भारतातच नाही तर पृथ्वीवरही स्वर्ग म्हटले जाते. या ठिकाणचे सौंदर्य लोकांना भुरळ घालते. वास्तविक, काश्मीर दोन भागांमध्ये विभागले गेले आहे, ज्याचा मोठा भाग भारताकडे आहे आणि काही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे, ज्याला POK म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर म्हणतात. याबाबत अनेकदा चर्चा होते. सध्या सोशल मीडियावर काश्मीरशी संबंधित एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक पाकिस्तानी व्यक्ती असे काही बोलताना दिसत आहे, की ऐकून तुमचे हृदय पिळवटून जाईल.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला रिपोर्टर एका पुरुषाला विचारते, ‘कश्मीर कोणाचे आहे’, ज्यावर तो उत्तर देतो की काश्मीर काश्मिरींचे आहे. यानंतर रिपोर्टर म्हणतो, ‘आम्ही म्हणतो काश्मीर पाकिस्तानचे आहे’, तर तो माणूस म्हणतो, ‘काश्मीर पाकिस्तानचे कसे झाले? भारताकडे काश्मीर आहे, भारताचे सैन्य आहे आणि पाकिस्तानचे सैन्य आहे.

यावर रिपोर्टर म्हणते की काश्मीर दोन भागात आहे, भारताकडे 60 टक्के आणि पाकिस्तानकडे 30 टक्के आहे तसेच  10 टक्के चीनकडे आहे. तेव्हा ती व्यक्ती म्हणते, ‘नाही-नाही, काश्मीर आता फक्त भारतीयांचे आहे. पाकिस्तानची परिस्थिती पाहता पोटभर अन्न मिळत नसेल तर काश्मीर मिळवायला कसे जाणार? मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे आणि त्यात किती तथ्य आहे, याचा दावा तरुण भारत लाईव्ह करत नाही.