भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये वानखेडेच्या मैदानावर सामना सुरु आहे. भारताची सुरुवात अतिशय खराब झाली, कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच चेंडूवर तंबूत परतला. पण त्यानंतर विराट कोहलीने शुभमन गिलच्या साथीने डावाला आकार दिला. रोहित शर्मा अवघ्या चार धावा काढून बाद झाला. त्यानंतर विराट कोहलीने मोर्चा संभाळला.
श्रीलंकेविरोधात विराट कोहलीने 34 धावा करताच मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. विराट कोहलीने सचिनचा विक्रम मोडला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळा एक हजार धावांचा विक्रम आता विराट कोहलीच्या नावावर जमा झालाय.
विराट कोहलीने आठव्यांदा एका वर्षांत एक हजार धावांचा पल्ला पार केला आहे. याआधी विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रत्येकी सात वेळा वनडे क्रिकेटमध्ये एका वर्षात एक हजारांपेक्षा जास्त धावा केल्या होता. आज विराट कोहलीने सचिन तेंडुलकरला मागे टाकलेय.