जळगाव : किरकोळ कारणावरून दोन रीक्षा चालकांमध्ये तुंबळ हामणारी झाली. प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रानुसार, शहरातील हरीविठ्ठल नगरात रीक्षा चालक हिरामण काशीराम बोरसे (वय 70) हे 31 जानेवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता इच्छा देवी चौकात गेले असता अज्ञात रीक्षा चालकाने हिरामण बोरसे यांना शिवीगाळ करत चापटाबुक्यानी मारहाण केली.
या झटापटीत खाली पडल्याने हिरामण बोरसे यांना उजव्या पायाच्या बाजूने कमरेजवळ हाड फ्रॅक्चर झाले. याप्रकरणी उपचारानंतर हिरामण बोरसे यांनी गुरुवार, 2 फेब्रुवारी रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरनू रीक्षा क्रमांक (एम.एच. 19 व्ही.2520) या क्रमांकाच्या रीक्षावरील बबलू पूर्ण नाव माहित नाही, याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.