कुंभ राशीत मार्गी होणार शनि; या राशींच्या लोकांच्या आयुष्यात होतील सकारात्मक बदल

तरुण भारत लाईव्ह । १० सप्टेंबर २०२३। ज्योतिशास्त्रात शनी देवाला न्याय देणारे मानले जाते. चार नोव्हेंबरला शनी मार्गी होणार आहे. ज्योतिष शास्त्रात शनिदेव हा सर्वात संथ गतीचा ग्रह आहे आणि एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. या काळात काही राशींच्या लोकांना त्यांच्या करियर च्या बाबतीत तसेच त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणार आहे. तर कोणत्या आहे त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

वृषभ रास
या काळात या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. तुमच्या कामातील अडथळे दूर होतील. व्यवसायात भरभराट होण्याची शक्यता आहे.

कन्या रास
या काळात मानसिक ताण कमी होईल.  व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये कठोर परिश्रम करावे लागतील. सर्व कामे सुरळीत पार पडतील.

कुंभ रास 
या काळात तुम्हाला स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कुटुंबात आनंदी आनंद असेल. वाहन खरेदी होऊ शकते.