कुटुंब गावी जाताच चोरटयांनी साधली संधी; घरातील रोकड दागिने घेऊन केले पलायन

तरुण भारत लाईव्ह । २१ सप्टेंबर २०२३। घराला कुलूप लावून कुटुंबातील सदस्य पोळा सणानिमिताने गावाला गेल्याची संधी हेरत चोरटयांनी बंद घरात प्रवेश करत कपाटातील सोनेचांदीचे दागिने तसेच रोकड असा सुमारे ७० हजाराचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना महाबळ परिसरातील संभाजीनगरमध्ये घडली.

सूत्रानुसार, नीना सोनाजी सावळे (६१) हे शेंदुर्णी महाविद्यालयातून सेवानिवृत्त झाले आहेत. शहरत महाबळ कॉलनी परिसरातील संभाजीनगरात प्लॉट नं ५३ गट नं ४५२ याठिकाणी त्यांचे रोहाऊस आहे. पोळा सणाला गावी जाण्याचा बेत आखत कुटुंबातील सदस्य १३ सप्टेंबर २३ रोजी सायंकाळी ४.३० ते ५ वाजेच्या सुमारास घराच्या दरवाजाला कुलूप सर्व सदस्य शेंदुर्णी या गावी गेले. सावळे यांचे रो हाऊस या बाजूला झाडे झुडपे आहेत घरात त्यामुळे घराच्या कंपाउंड मध्ये कोणीही प्रवेश केला तर कोणाच्या नजरेस पडत नाही हा फायदा उचलत चोरट्याने गेट उघडून घरात प्रवेश केला.

दरवाजाचा कडी कोयता तोडून चोरटे आत घुसले. घरातील सामान अस्तव्यस्त करत मुद्देमालाचा शोध घेतला. लोखंडी कपाटाचे लॉक तोडून ते उघडले कपडे साड्या बाहेर फेकून दिले. समान अस्तव्यस्त केला कपाटाचे लोक तोडले असताना चोरट्याना मोठा हात मारता आला. येथे ठेवलेली १७००० ची रोकड तसेच दागिने हाती लागल्याने चोरटे आरामाने या रो हाऊस मधून बाहेर पडले. आणि क्षणात पसार झाले. अगदी आजूबाजूच्या लोकांनाही या चोरी बद्दल सुगावा लागला नाही. हे चोरटे सराईत असणारी शक्यता वर्तवली जात आहे.

रोख १७ हजार रुपये वीस हजार किमतींचा 15.5 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन दहा हजार किमतीचा पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी 8000 किमतीचा 4000 सोन्याचा वेढा ४ ग्राम सोन्याचा वेढा पाच हजार रुपये किमतीचा. पाच हजार रुपये किमतीचे अकरा ग्राम चांदीची पायल 5000 किमतीचे चांदीचे दहा हातातील ब्रेसलेट असा एकूण 70 हजार रुपये लांबवला. नंतर सोमवार 18 रोजी सायंकाळी कुटुंबातील सदस्य घरी जळगाव येथे परतल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. घटना घडताच शिल्पा पाटील तसेच कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. याप्रकरणी बुधवार 19 रोजी निना सावळे यांच्या तक्रारीनुसार चोरीचा गुन्हा रामानंदनगर पोलीस ठाण्यात  दाखल करण्यात आला.