Uddhav Thackeray Podcast जी मंडळी दिवस-रात्र शिवसेनाप्रमुखांसह आपल्याला आणि प्रसंगी चिरंजीव आदित्य यांनाही मुजरा करीत होती, त्यांच्यावर नरेंद्र मोदींना मुजरा करायला दिल्लीत जाण्याची वेळ कोणी आणली, हेसुद्धा सांगायला हवे का? बोलघेवडे, वाचाळवीर संजय राऊत त्यांनीच ही वेळ शिवसेनेवर आणली, असे लोक तर म्हणायलाच लागले आहेत. सकाळी टीव्ही लावला आणि संजय राऊत बोलताना दिसले तर समजायचे सकाळचे ९ वाजले म्हणून! इतकी टिंगल-टवाळी कदाचित उद्धव साहेबांच्याही कानावर आली असावी. पत्रकार झालो म्हणजे काहीही बोलायचा परवाना मिळतो असे थोडीच आहे? सध्या एकनाथ शिंदेंचे व्यवस्थित चाललेय्. त्यांच्या पक्षात नाराजी नाही, असे नाही. पण त्यांनी आपला गट चांगला एकत्र ठेवलाय्. Uddhav Thackeray Podcast वेळोवेळी ते देवेंद्र फडणवीस आणि आता अजित पवार यांचा आणि कधीमधी अमित शाह यांचा सल्ला घेतात आणि राज्यासाठी निधी आणण्याचा अथवा येथे अडलेले प्रश्न सोडविण्याची वेळ येताच दिल्लीत नरेंद्र मोदींना मुजरा करायलाही जातात. पण असे मुजरा करणे राज्याच्या दृष्टीने फायद्याचे असेल तर राज्यातील जनतेला ते दररोज जरी दिल्लीला मुजरा करायला गेले तरी काही वाटणार नाही.
विधानसभेचे अधिवेशन सुरू असतानाही एकनाथ शिंदे यांनी इर्शाळवाडीची घटना कळताच हातातले काम बाजूला सारून पीडितांचे अश्रू पुसण्यासाठी धाव घेतलीच की नाही? अहो शेवटी बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेले आहेत मुख्यमंत्री शिंदे! त्यामुळे कर्तव्यात कुठलीही कसूर ठेवणार नाहीत ते! पण कर्तव्य पार पाडत असताना ते तुमच्या नव्हे तर मोदींच्या सल्ल्यानुसार वागत असल्याने तुमच्या पोटात जळजळ होतेय्, हे राज्याच्या जनतेला कळत नाही असे म्हणताय का? Uddhav Thackeray Podcast आपला पक्ष का फुटला? आणि आपल्यावर ओसाड पक्षाचे पाटील होण्याची वेळ का आली? हे तर आपल्याशिवाय दुसरे कुणीही सांगू शकत नाही. अहो, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसाठी मातोश्रीचे दरवाजे दिवस-रात्र उघडे होते आणि राज्यातील लोकांच्या समस्यांची गा-हाणी घेऊन येणारे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते ताटकळून, निराशेने परतत होते. बरे एकदा, दोनदा नव्हे अशी पाळी वारंवार आमदारांवरही आली आणि तेव्हा ‘खळ्ळखट्याक’ शिवाय पर्याय नाही, हे शिंदे आणि त्यांच्या शिलेदारांनी हेरले आणि गनिमी काव्याने ५० आमदारांचा गट, उद्धव ठाकरे आपल्या कुंचल्याने घरी बसून राज्याचे चित्र रंगवण्यात गुंग झाले असता, कामाख्येच्या दरबारात पोहोचला. नंतरच्या घडामोडी कशा बदलत गेल्या ते सा-यांना ठाऊक आहे.
Uddhav Thackeray Podcast याच मुलाखतीत संजय राऊत यांनी अपेक्षित उत्तरे यावीत म्हणून उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारले. त्यात मणिपुरातील हिंसाचार, गोवंश हत्या बंदी, समान नागरी कायद्यावरून उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांचा खरपूस समाचार घेतला म्हणे! आताशी खरपूस शब्दही घासून गुळगुळीत करून टाकला उद्धवजींनी. उद्धव यांनी आपला सामना अटलजी, अडवाणी यांच्या काळातील भारतीय जनता पार्टीशी नाही, हे पुरते ध्यानात घ्यावे. तेव्हाचे अतिशय शांत, संयत, कुणालाही अंगावर न घेणारे भाजपाचे तरणेबांड कार्यकर्ते आता राजकारणात परिपक्व झाले आहेत. त्यांचा गल्ल्यांमधील राजकारणाचा डंका आता मुंबई, दिल्लीतच नव्हे, सातासमुद्रापार वाजू लागला आहे. त्यामुळे ते आंतरराष्ट्रीय सभा संमेलने गाजवतात, दिल्लीत विरोधकांना धडकी भरवतात आणि राज्या-राज्यात परिवारवादी राजकारण्यांच्या चिंधड्या उडवत त्यांच्या दुखावलेल्या शिलेदारांना जहागिरी बहाल करतात. Uddhav Thackeray Podcast कदाचित यावरून उद्धवजींचा २०२४ मध्ये हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर देशात लोकशाही राहणार नाही, असा समज झाला असावा. उद्धवजी कुठल्या नंदनवनात राहात आहेत माहीत नाही. अहो, आपला पक्ष ज्यांना सांभाळता येत नाही, त्यांनी खोटी भाकिते आणि वल्गना करण्यापेक्षा आपल्याजवळ जे शिलेदार उरले आहेत, त्यांची खातिरदारी करून, त्यांची पळापळ थांबविण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा येत्या काळात पक्षासोबत नॅनोत मावतील एवढेही शिलेदार उरायचे नाहीत!
निवडणुका वेळच्या वेळी होणारच आहेत. त्यासाठी संविधानाने तरतूद करून ठेवली आहे. Uddhav Thackeray Podcast हिमाचल, कर्नाटकात निवडणुका झाल्याच ना! आणि भाजपाने जोरदार प्रयत्न करूनही काँग्रेसचा विजय झालाच ना! वारंवार मोदी आपल्या स्वप्नात येत असताना पश्चिम बंगालमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या ४० जणांच्या राजकीय हत्या आपल्याला दिसल्या नाहीत की त्यावेळी आपण डोळे बंद करून ठेवले होते? मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेले पलायन, हिंसाचार, शस्त्रास्त्रांचा बाजार, अफूची शेती, अमली पदार्थांची तस्करी, म्यानमारमधून होणारी घुसखोरी आपल्या पारखी नजरेतून कशी सुटली म्हणावी? आणि हो, त्या घटना संजय राऊतांच्या दिव्य दृष्टीतून तरी कशा सुटल्या? Uddhav Thackeray Podcast एरवी पराभव झाला की, ईव्हीएमवर खापर फोडणा-या विरोधकांना हिमाचल, कर्नाटकात काँग्रेस जिंकली तेव्हा ईव्हीएमची साधी आठवणीही झाली नाही, याचे कारण समजू शकेल का? पक्षाचे नाव, चिन्ह, निधी, जमिनी याबाबतचा निर्णय कोण ठरवेल, याचे निर्देश राज्य घटनेने दिलेले आहेत. त्यानुसार निरनिराळ्या यंत्रणा कार्य करीत आहेत. असे असताना त्यांनी उद्धवजींना योग्य वाटेल, असा निर्णय देण्याची अपेक्षा कशी बाळगता येईल.
Uddhav Thackeray Podcast इतरांनी नियम पाळायचे आणि आपण केवळ टीकेत वेळ घालवायचा, ही बाब आमच्या आकलन कक्षेबाहेरची आहे. भाजपाप्रणीत रालोआत ३६ पक्ष सहभागी झाल्यानेही आपली पोटदुखी वाढल्याचे कळले. ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआयच्या भीतीमुळेच ही मंडळी रालोआत सहभागी झाली आहे, असे म्हणणे असेल तर तसे सांगावे. ज्याचे नावही उच्चारणे आणि समजायला कठीण आहे, त्या ‘इंडियाङ्क नावाच्या आघाडीत जास्तीत जास्त समिधा टाकून शिवसेनेने या आघाडीची योग्य चाकरी केली तरी मिळविले. आपलेच मावळे मनाने का विकले गेले, याचा थांगपत्ता नसलेल्या उद्धवजींना आता उप-या लोकांची मदत घ्यावी लागत आहे. त्यांनी म्हणे वर्षानुवर्षे जागा अडवल्या. Uddhav Thackeray Podcast त्यांचे मुजरे घेताना तुम्हाला याची कधीच कशी जाणीव झाली नाही? आज त्यांनी पैलतीर गाठताच तुम्हाला त्यांच्यातील न्यून दिसू लागले आहे. आपल्या डोळ्यातील कुसळ बघायचे सोडून प्रतिपक्षातील लोकांचे मुसळ बघण्याचा प्रयत्न अंगलट आल्याशिवाय राहायचा नाही. २०२४ चे घोडामैदान जवळच आहे, तेव्हा नुसत्याच वल्गना करण्यापेक्षा बाजी मारून दाखविली तर कार्यकर्ते तुम्हाला मुजरा करायला मागेपुढे पाहणार नाहीत.