तरुण भारत लाईव्ह । ५ ऑक्टोबर २०२३। कुलूपबंद घराला लक्ष्य करत चोरटयांनी सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल तसेच इतर वस्तू असा सुमारे ४४.५५० रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना प्रजापत नगरमधील पवननगर परिसरात घडली हा प्रकार मंगळवार ३ रोजी सकाळी ८.३० वाजता उघडकीस आला.
शहरातील पवननगर प्लॉट नंबर १० याठिकाणी छायाबाई भटू बडगुजर (५३) तसेच त्यांची मुलगी अनुराधा वास्तव्यास आहेत. शुक्रवार २९ रोजी ते कामानिमित्त घराच्या दरवाज्याला कुलूप लावून गावाला गेले हि संधी साधून चोरटयांनी घराचा कडीकोंडा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातील सामान अस्ताव्यस्त करत कपाटातील लॉक तोडत दागिने, चांदीच्या मूर्ती शिक्के साहित्य असे घेऊन चोरटे पसार झाले. छायाबाई या मंगळवार ३ रोजी सकाळी ८.३० वाजता घरी आल्या असता त्यांना कडीकोयंडा तुटलेला दिसला. आत प्रवेश केल्यानंतर कपाटाचे लॉकर तोडून सामान अस्ताव्यस्त केल्याचे त्यांना दिसले.
१० हजार किमतीचे दोन मोबाईल, २० हजार किमतीचे १० ग्राम वजनाची सोन्याची पाटली बांगडी, ३ हजार रुपये किमतीचे सव्वा ग्राम वजनाचे कानातील टॉप्स, १० हजार रुपये किमतीच्या अडीच ग्राम वजनाच्या कानातील रिंग २ नग, ३ हजार किमतीचे १ ग्राम वजनाचे सोन्याचे ओम नावाचे पदक १ हजार किमतीचे चांदीचे गणपती व महालक्ष्मीचे फोटो असलेले देवाचे ५ शिक्के, अडीच ग्राम वजनाचे डायमंड कानातले कानातले, १ हजार रुपये किमतीचा पेनड्राईव्ह हार्ड डिस्क व लॅपटॉप बॅटरी असा एकूण ४४. ५५० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
हि घटना कळाल्यावर तालुका पोलीस ठाण्याचे महेश शर्मा, माणिक सपकाळे, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेत पाहणी केली, कडीकोंडा तसेच कपाटाचे लॉक तोडण्याची पद्धत लक्षात घेतली कुलूपबंद घराचा दिवस शोध घेऊन रात्री घर फोडायचे हा फंडा चोरटयांनी याठिकाणी आमलात आणला असे सूत्रांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी छायाबाई बडगुजर यांच्या तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.