तरुण भारत लाईव्ह । ६ सप्टेंबर २०२३। आज जन्माष्टमी आहे. तर आपण सगळे श्रीकृष्णाची विधिवत पूजा करतो. तसेच त्याला नैवद्य दाखवून आरती करतो. श्रीकृष्णाचे आवडते जेवण म्हणजे दही भात म्हणूनच श्रीकृष्णाला दहीभाताचा नैवैद्य दाखवला जातो. दही भात घरी बनवायला अगदी सोप्पा आहे. दही भात कसा बनवावा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.
साहित्य
तांदूळ, दही, दूध, हिंग, लाल मिरच्या, कढीपत्ता, मीठ, कोथिंबीर, जिरे, मोहरी.
कृती
सर्वप्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावा. यानंतर कुकरमध्ये तांदूळ शिजवावा. भात थंड झाल्यानंतर त्यात दही आणि दूध टाकावे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि किसलेलं आले घालावे. यानंतर एका कढईत तेल टाका आणि गरम तेलात कडीपत्ता, जिरे, मोहरी, हिंग आणि सुक्या लाल मिरच्या टाकून फोडणी द्या. आता ही फोडणी भातावर टाकून द्या तसेच कोथिंबीर बारीक चिरुन भातावर टाका. तयार आहे दही भात