कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान

तरुण भारत लाईव्ह । २२ सप्टेंबर २०२३। कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे. या देशाची पाकिस्तानलाही मदत आहे. असा जोरदार हल्ला भारताने गुरुवारी कॅनडा वर केला.  कॅनडाने केलेला आरोप राजकीय प्रेरित आहे. खलिस्ताने अतिरेकी हरदीपसिंग निज्जरबाबतची कोणतीही माहिती कॅनडाने आम्हाला दिलेली नाही.असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी येथे झालेल्या साप्ताहिक पत्र परिषदेत स्पष्टपणे मांडले.

कॅनडा दहशतवाद्यांचे आश्रयस्थान झाले आहे. तिथे दहशतवादी आणि कट्टरपंथीयांना आश्रय  दिला जातो. कॅनडाला आपल्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेची  चिंता करण्याची गरज निर्माण झाली आहे. असे अरिंदम बागची यांनी सांगितले. कॅनडाचे कितीतरी जास्त राजनयिक भारतात आहेत कॅनडातील आपल्या राजनयिकांची संख्या अतिशय कमी आहे. येत्या काही दिवसात दूतावासाच्या कर्मचाऱ्यात आणखीन कपात केली जाईल. परस्परांच्या राजनियकांच्या संख्येत समानता असावी असे आम्ही कॅनडाला सांगितले आहे.

आपल्या तुलनेत कॅनडाच्या राजकीयकांची संख्या खूप जास्त आहे असे बागची यांनी सांगितले. सावधगिरी बाळगण्याबाबत आम्ही केली असे बागची यांनी कॅनडात राहणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. आपले वाणिज्य दूतावास तिथे काम करीत आहे. समस्या आल्यास वाणिज्य दुतावासा सोबत संपर्क साधावा असे विद्यार्थ्यांना सांगण्यात आले आहे.

ते भारतीय नागरिक असल्याने आपला व्हिसा धोरणाचा त्यांच्यावर कोणताही परिणाम होणार नाही. कॅनडातील भारतातल्या मुत्सद्यांची संख्या जास्त आहे. भारत आणि कॅनडाची ही संख्या समान असावी असे कॅनडाला सांगितले आहे .अशा परिस्थितीत कॅनडाची अतिरिक्त मुत्सद्यां परत पाठवले जातील असे बागची यांनी स्पष्ट केले. कॅनडातील आमचा उच्चयोग आणि वाणिज्य दूतावास या सुरक्षा धोक्यांचा सामना करीत आहे. त्याची कल्पना तुम्हाला आहे असे  कॅनडातील व्हिसा सेवेचा सद्यस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बागची  यांनी सांगितले.

यामुळे सामान्य कामकाज बाधित झाले आहे आमचे उचायोग आणि वाणिज्य दूतावास  सध्या व्हिसा अर्जावर काम करू शकत नाही. आम्ही येथील स्थितीचे नियमितपणे विश्लेषण करू. दूतावासाला सुरक्षा प्रदान करण्याची जबाबदारी यजमान देशाची असते. असे कॅनडातील भारतीय वाणिज्य दूतावासाची सुरक्षा वाढण्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले काही ठिकाणी आपली सुरक्षा व्यवस्था आहे परंतु यावर सार्वजनिकरित्या चर्चा करणे योग्य ठरणार नाही. असे बागची यांनी स्पष्ट केले