तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। कॅनडा मधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. कॅनडामध्ये विमानाचा मोठा अपघात झाला. या अपघातात दोन भारतीयांसह तीन प्रक्षिणार्थी वैमानिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने धाव घेत बचावकार्य सुरू केले.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, दोन इंजिन असलेले कमी वजनाचे विमान पायपर पीए-३४ सेनेका, ब्रिटिश कोलंबियाच्य चेविवैक शहरातमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. कॅनडाच्या वँकूवरजवळील चिल्लीवॅक येथे विमान झाडावर कोसळल्याने भीषण अपघात झाला. पायलट अभय गडरु आणि यश विजय रामुगडे या दोन पायलट चा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. या अपघातात एकूण तीन जणांना जीव गमवावा लागला आहे.
या अपघातात सार्वजनिक ठिकाणाला नुकसान झालेले नाही. विमानाचा अपघात झाल्याचे समजताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले होते. या प्रकरणात अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास केला जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली. या दुर्देवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.