---Advertisement---

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

---Advertisement---

पुणे : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह आज (6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत.  बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे.

पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहात हा कार्यक्रम पार पडेल. त्याअनुषंगाने  प्रेक्षकगृह परिसरात छावणीचे स्वरूप आलं आहे. पुण्यातील पंचतारांकित हॉटेल ते पिंपरीतील रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह दरम्यान ताफ्याची रंगीत तालीमही काल पार पडली.

पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं अमित शाहांनी या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड केल्याचं बोललं जातं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

काल संध्याकाळी ते पुण्यातील जे डब्यू मेरिएट हॉटेलवर दाखल झाले. त्यानंतर आज सकाळी ते थेट चिंचवडच्या मोरे प्रेक्षकगृहात हजेरी लावणार आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment