केएल राहुलचे हे विधान ट्रोल्सच्या तोंडावर चपराक, शतक झळकावल्यानंतर बोलला मनापासून…

भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळत आहे. सेंच्युरियनच्या सुपर स्पोर्ट्स पार्कमध्ये हा सामना खेळला जात आहे.

या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 245 धावा केल्या. केएल राहुलच्या शतकाने संघाला ही धावसंख्या गाठण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राहुलने 101 धावांची खेळी केली. राहुलची ही खेळी अशा वेळी आली जेव्हा संघाला त्याची सर्वाधिक गरज होती.

या शतकासह राहुलने सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाल राहूल?

दुसऱ्या दिवशी, बुधवारचा सामना संपल्यानंतर जेव्हा राहुलला विचारण्यात आले की, लोक सोशल मीडियावर त्याला ट्रोल करतात तेव्हा त्याला राग येत नाही का ? त्यावर राहुलने उत्तर दिले की, यातून मला काहीही मिळणार नाही. लोकांना जे म्हणायचे आहे ते म्हणतील असे राहुल म्हणाले.

त्याने सांगितले की, जर तुम्ही पब्लिक परफॉर्मर असाल तर तुम्हाला तुमच्या कामगिरीने उत्तर द्यावे लागेल, तरच तुम्ही टीका टाळू शकता. तुम्ही सोशल मीडियापासून जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल, असे राहुल म्हणाले.