तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। राहू आणि केतू हे दीड वर्षानंतर राशी बदल करणार आहेत. केतु वक्री गोचर करत कन्या राशीत प्रवेश करणार आहे. ३० ऑक्टोबरला कन्या राशीत प्रवेश करणार आहे. नोव्हेंबर पासून काही राशींच्या लोकांना लाभ मिळणार आहेत तर कोणत्या आहेत त्या राशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून .
मेष रास
या काळात मेष राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ होणार आहेत. उत्पनाचे नवे मार्ग सापडतील. आरोग्यात सुधारणा होईल. नशिबाची पूर्ण साथ तुम्हाला या काळात मिळेल. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील.
मिथुन रास
या काळात मिथुन राशीच्या लोकांना भरपूर प्रमाणात लाभ होणार आहे. नव्या नोकरीच्या शोधात असाल तर चांगल्या नोकरीची ऑफर येऊ शकते. आरोग्याच्या समस्या संपुष्ठात येतील. घरात खेळीमेळीचे वातावरण असेल.
तूळ रास
या काळात तूळ राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल. अडकलेला पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. नातेवाईकांच्या गाठीभेटी होतील. भेटवस्तू मिळेल. आवडते भोजन करायला मिळेल.