केरळ स्फोटामागे हमास? जारी झाला होता अलर्ट!

केरळमधील कलामासेरी येथील जामरा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला आहे. या घटनेकडे दहशतवादी हल्ला म्हणून पाहिले जाते. या स्फोटमध्ये एकाचा मृत्यू आणि २३ हून अधिक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. हा स्फोट ज्या जामरा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तिथे यहोवा (ख्रिश्चन धर्मातील एक पंथ) पंथाचे एक अधिवेशन चालू होते. या अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता.
दरम्यान, सकाळी ९:४० वाजता स्फोट झाला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, काही मिनिटांच्या अंतराने तीन स्फोट झाले. स्फोटाच्या कारणाबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. तथापि, काही माध्यमांमध्ये दावा करण्यात आला आहे की, हा स्फोट एक दहशतवादी कृत्य आहे.
जामरा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये तीन दिवसीय कार्यक्रमात सुमारे २००० लोक सहभागी झाले होते. कार्यक्रमात महिला आणि लहान मुले देखील सहभागी होती. यातील बहुतांश लोक अंगमाली येथील होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी, फॉरेन्सिक विभाग, बॉम्बशोधक पथक आणि एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली आहे. त्याचबरोबर नजीकच्या कलामसेरी शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून त्यांना तातडीने कर्तव्यावर हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
केरळमध्ये दोन दिवसापूर्वीच जमात-ए-इस्लामीच्या युवा शाखा ‘सॉलिडॅरिटी युथ मूव्हमेंट’ द्वारे पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ एक रॅली काढण्यात आली होती. या रॅलीला हमास या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या रशीद मशालने संबोधित केले होते. यावेळी इतर धर्मांच्या लोकांविरोधात भडकाऊ घोषणाबाजी करण्यात आली होती.