पारोळा : येथील टायगर इंटरनॅशनल स्कूल येथे सिनियर केजी, फर्स्ट स्टॅंडर्ड आणि सेकंड स्टॅंडर्ड च्या विद्यार्थ्यांना कैवल्य ज्ञान परिवाराकडून संस्काराचे धडे देण्यात आले त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना खोटे बोलू नये, चोरी करू नये, अशा वाईट गोष्टींपासून दूर राहावे अशा प्रकारचे ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्यात आले.
तसेच राम नाम घेतल्याने असंभव कार्य संभव होतात, स्मरणशक्ती सुधारते, चांगले गुणांचे आचरण व निर्भयपणा अंगी येतो. या विषयीचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन भडगाव येथील उषा गाडगे यांनी केले. तसेच उपस्थित अनिल गाडगे, सुनंदा माळी, भैय्या साळुंखे यांनीही विद्यार्थ्यांकडून नामस्मरण करून घेतले.
यावेळी टायगर इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष रवींद्र पाटील, संचालिका रूपाली पाटील, प्राचार्य अजीम शेख, उपप्राचार्य कविता सूर्यवंशी तसेच सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
आभार कविता सूर्यवंशी यांनी मानले.