बँकेत नोकरी करण्याचे तुमचे स्वप्न असेल तर ही मोठी संधी तुमच्यासाठी आहे. युको बँकमध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या भरतीची अधिसूचना बँकांच्या संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. एकूण 142 जागा भरल्या जाणार असून ही भरती प्रक्रिया फक्त ऑफलाइन पद्धतीनेच होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच उमेदवारांना आपले अर्ज पाठवावे लागणार आहेत.
पदाचे नाव :
1) स्पेशलिस्ट ऑफिसर 127
2) मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-MMGS-II 15
शैक्षणिक पात्रता:
स्पेशलिस्ट ऑफिसर (i) B.E./B.Tech./B.Sc./M.Tech/M.E/ MBA/PGDM/PGDBM/MCA/LLB/CA/पदव्युत्तर पदवी (ii) 01/02/03/04/05/06/08 वर्षे अनुभव
मॅनेजर-रिस्क मॅनेजमेंट-(i) CA/CFA/MBA(फायनान्स)/PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
अर्ज शुल्क : या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांना 800 रूपये फिस ही भरावी लागणार आहे. तसेच काही प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फिसमध्ये सूट देखील देण्यात आलीये.
असा करा अर्ज?
या भरती प्रक्रियेसचा अर्ज भरण्यासाठी उमेदवारांना ucobank.com या साईटवर जावे लागेल. तिथेच उमेदवारांना भरती संदर्भातील सर्व माहितीही मिळेल. भरती प्रक्रियेसाठी लागणारा अर्ज उमेदवारांना ucobank.com साईटवरच मिळणार आहे. तो अर्ज डाऊनलोड करून घ्या. भरलेला अर्ज हा महाव्यवस्थापक, युको बँक, मुख्य कार्यालय, चौथा मजला, एच.आर. विभाग, 10, बीटीएम सारनी, कोलकाता, पश्चिम बंगाल – 700 001. येथे पाठवावा लागेल.
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form):