crime news pune : पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्याची ही घटना ताजी असतानाच आता आणखी एका तरुणाने थेट कॉलेजमध्येच कोयता काढल्याचा प्रकार समोर आला आहे.
पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील हा सगळा प्रकार आहे. कुणाल कानगुडे असं 19 वर्षीय या तरूणाचं नाव आहे. कुणालने रागाच्या भरात कॉलेजमध्येच कोयता काढल्याची घटना घडलीये.
काही दिवसांपूर्वी कुणाल कानगुडेचा आबासाहेब गरवारे महाविद्यालयात डॅनी या तरुणाशी काही वाद झाला होता. त्यानंतर कॉलेजमध्ये आपली दहशत राहावी. तसंच इतरही काही भांडणाच्या कारणामुळे त्याने थेट कॉलेजमध्ये कोयता काढून दहशत माजवली.
लिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कॉलेजमधील सीसीटीव्ही तपासलं. कुणाल कानगुडे याला अटक करून डेक्कन परिसरातून त्याची धिंड काढली. पुण्यात कोयता काढणाऱ्या भाईची धिंड काढण्यात आली. कॉलेजमध्ये कोयता काढला तिथूनच काढली त्याची ‘वरात’ काढण्यात आली. अशी कृत्य करण्याचं धाडस होऊ नये. चाप बसावा म्हणून कोयता काढणाऱ्या तरुणाची धिंड काढण्यात आली आहे.