कोहलीमुळे ऋषभ पंतला होणार मोठा फायदा, रोहित शर्मा करणार धमाका ?

T20 World Cup 2024 : न्यूयॉर्कमधील नासाऊ क्रिकेट स्टेडियमवर  आज बुधवारी रात्री ८ वाजता टीम इंडिया आयर्लंडविरुद्ध टी-20 वर्ल्ड कपमधील पहिला सामना खेळणार आहे. या स्पर्धेतील दोन्ही संघांचा हा पहिलाच सामना असेल, अशा स्थितीत विजयाने सुरुवात करण्याची इच्छा टीम इंडिया इतकीच आयर्लंडचीही असेल. मात्र, टीम इंडियाच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विराट कोहली रोहित शर्मासोबत सलामी करू शकतो अशी माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे ऋषभ पंतला लॉटरी लागू शकते. टीम इंडिया ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकते, असे वृत्त आहे.

ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी देण्याचे एक कारण म्हणजे यशस्वी जैस्वालला वगळणे हे असू शकते. असे मानले जाते आहे की जर टीम इंडियाने विराटला सलामी दिली तर पंत हा नंबर 3 वर चांगला पर्याय असेल. सराव सामन्यातही त्याने हे सिद्ध केले आहे. पंतने न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर बांगलादेशविरुद्ध शानदार अर्धशतक झळकावले होते. पंतने निर्भयपणे शॉट्स खेळले होते. ही गुणवत्ता त्याला 3 व्या क्रमांकावर संधी देण्यास भाग पाडत आहे. म्हणजे टीम इंडियाने पहिली विकेट लवकर गमावली तरी पंत वेगवान फलंदाजी करून धावगती वाढवू शकतो. पंतनंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजासारखे फलंदाज आक्रमक फलंदाजीसाठी ओळखले जातात.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
भारतीय संघ कोणत्या प्लेइंग इलेव्हनसह मैदानात उतरणार आहे, हाही महत्त्वाचा प्रश्न आहे. शिवम दुबे या संघात राहणार की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सिराज आणि अर्शदीप यांच्यापैकी कोण प्लेइंग इलेव्हनमध्ये राहणार हाही प्रश्न आहे. टीम इंडियाचे प्लेइंग इलेव्हन असे असू शकतात – रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.