---Advertisement---

क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे उद्या जळगाव जिल्हा दौऱ्यावर

---Advertisement---

जळगाव : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या मंत्री झाल्यानंतर शनिवारी (दि.१५) प्रथमच जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.

रक्षा खडसे यांचे दि. १५ रोजी, पहाटे ५.२५ वाजता मुंबईहून रेल्वेने भुसावळला आगमन होईल. तेथून त्या मुक्ताईनगरला रवाना होणार आहेत. या ठिकाणी सकाळी १० वाजता नागरिक आणि दुपारी २ वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

दि. १६ रोजी, सकाळी ११ वाजता नागरिक व दुपारी ४ वाजता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील. दि. १८ रोजी, त्या छत्रपती संभाजीनगरला व तेथून दिल्लीला रवाना होणार आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment