क्षुल्लक कारणातून वादाची ठिणगी पेटली, तिथंच चाकूने… जळगावातील घटना

जळगाव : कारण नसताना दुचाकीवर आलेल्या दोघांनी दोन्ही भावांवर चाकू हल्ला करून गंभीर दुखापत केली. जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा येथे गुरूवार २८ रोजी रात्री १ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.

जळगाव तालुक्यातील रायपूर येथे मिथुन फकीरा परदेशी (२५)  हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. तो एमआयडीसीतील एका चटई कंपनीत कामाला आहे. गुरुवार रोजी मिथुन परदेशी याचा भाऊ विशाल परदेशी आणि त्याचे मित्र काही रात्री १ वाजेच्या सुमारास गप्पा मारत असताना दुर्गेश कैलास परदेशी आणि श्रीकांत मनोहर धनगर हे दोघे जण दुचाकीने चकरा मारत होते.

यावेळी विशाल परदेशी याने चकरा का मारत आहे. असा बोलण्याचा राग आल्याने संशयित आरोपी दुर्गेश कैलास परदेशी आणि श्रीकांत मनोहर धनगर या दोघांनी विशाल परदेशी व  मिथुन परदेशी या दोन्ही भावांवर चॉपर हल्ला करून पाठीवर व हातावर वार करून जखमी केले.

तसेच आमच्या नांदी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन पसार झाले. जखमी झालेल्या विशाल परदेशी व मिथून परदेशी यांनातातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. दरम्यान  मिथुन परदेशी याने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी श्रीकांत मनोहर धनगर व दुर्गेश कैलास परदेशी दोन्ही रा.रायपूर कुसुंबा तालुका जिल्हा जळगाव यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान एमआयडीसी पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोहेकॉ गफ्फार तडवी करीत आहे.