खबरदार! दारु पिऊन गाडी चालवाल तर… नंदुरबार पोलिसांनी कसली कंबर

वैभव करवंदकर 
नंदुरबार  : वर्षाच्या अखेरीस अर्थात ३१ डिसेंबर रोजी काही अति उत्साही नागरिक सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग, दारु पिऊन वाहन चालवित असतात. परिणामी अपघाताला सामोरे जावे लागले.  त्यामुळे अशी दुर्घटना होऊ नये, यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहीम राबवून तब्बल 29 दारुड्यांवर कारवाई केली आहे.

पी. आर. पाटील म्हणाले की, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. मद्यपान करुन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करणेची कारवाई करण्यात येईल.

त्याअनुषंगाने नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने दिनांक 20/12/2023 नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार शहर पोलीस ठाणे – 04, उपनगर पोलीस ठाणे – 01, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे – 02, नवापूर पोलीस ठाणे – 04, विसरवाडी पोलीस ठाणे – 03, शहादा पोलीस ठाणे – 03, धडगांव पोलीस ठाणे – 01, म्हसावद पोलीस ठाणे – 02, अक्कलकुवा पोलीस ठाणे – 03, तळोदा पोलीस ठाणे – 02, मोलगी पोलीस ठाणे – 01 शहर वाहतूक शाखा – 03 असे एकुण 29 मद्यपी वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मद्यपान करुन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उप प्रादेशिकपरिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात आले असून लवकरच त्यांचेवर परवाने निलंबनाची कारवाई करण्यात येईल. तसेच सदरची मोहीम भविष्यात आणखी तीव्र करण्यात येणार आहे.