---Advertisement---

खमंग पौष्टिक कांदा पराठा रेसिपी

---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। जवळपास प्रत्येकाला पराठा आवडतो. मेथी पराठा, पालक पराठा, आलू पराठा, मात्र तुम्ही कधी कांदा पराठा खाल्ला आहे का? कांदा पराठा अत्यंत पौष्टिक आणि खायला तितकाच टेस्टी असतो. हा कांदा पराठा घरी कसा बनवला जातो हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
कणीक, मैदा, मीठ, साखर, तूप.

कृती
सर्वप्रथम,बारीक चिरलेले कांदे घ्यावे. त्यात चवीपुरतं मीठ आणि तिखट टाकावे. चिमुटभर साखर टाकावी. हे मिश्रण एकत्र करावे. मीठ-साखर आणि तुपाचं मोहन घालून कणीक आणि मैदा भिजवून घ्या. मध्यम आकाराचे बारा फुलके करावेत. आता एका फुलक्यावर कांद्याचं मिश्रण पसरावं. त्यावर दुसरा फुलका ठेवून कडाने चिकटवावा. त्यानंतर हलक्या हातानं पराठा लाटावा व तव्यावर भाजावा. तयार आहे गरमागरम कांदा पराठा.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment