खरेदीदारांना दिलासा ! सोन्याचे दर तीन आठवड्याच्या नीच्चांकीवर, चांदीही घसरली

मुंबई । गेल्या काही महिन्यात सोन्यासह चांदीच्या दरात वाढ पाहायला मिळत आहे. दिवाळीनंतरही सोन-चांदीच्या दरात चढ-उतार सुरु आहे. गेल्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत विक्रमी वाढ झाली होती. यामुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा झटका बसला. मात्र या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण दिसून आली.

सोमवारच्या सत्रात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर तीन आठवड्याच्या नीचांकी पातळीवर आले.या आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरांनी पडझड नोंदवल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या भावांनी यूटर्न घेतला आहेत.

आज, १२ डिसेंबर रोजी दोन्ही मौल्यवान धातूंच्या फ्युचर्स (वायदे) किमतीत तेजी पाहायला मिळाली. यासह सोन्याच्या फ्युचर्सचे भाव ६१,३०० रुपयांच्या आसपास तर चांदीचे फ्युचर्स ७२,२०० रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहेत. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या-चांदीच्या फ्युचर्स किमतीत तेजी दिसत आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवरील आजचे दर 

आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा दर  १९९ रुपये वाढीसह ६१,२३६ रुपयांवर खुला झाला तर या दरम्यान, दिवसभरातील उच्चांक ६१,३३० रुपये तर ६१,२३२ रुपयांचा नीचांक नोंदवला. याशिवाय गेल्या आठवड्यात सोन्याच्या फ्युचर्सच्या किमतीने ६४,०६३ रुपयांच्या उच्चांकावर उडी घेतली होती.

दुसरीकडे सोन्याप्रमाणे चांदीच्या वायदे किमतीतही तेजी कायम आहे. एमसीएक्सवर चांदीचे मार्च फ्युचर्स आज २१७ रुपयांनी वाढून ७२,०८१ रुपयांवर उघडले तर गेल्या आठवड्यात चांदीच्या फ्युचर्सच्या किमतींनी ७८,५४९ रुपये प्रति किलोच्या सर्वोच्च पातळीवर झेप घेतली होती. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या वायदे दरात वाढ नोंदवली गेली असली तरी सराफा बाजारात मात्र सोन्याच्या किमतीत मोठा दिलासा मिळाल्यास दिसत आहे.