खळबळजनक! मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी सुदर्शनं उचललं टोकाचं पाऊल

मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात तापला आहे. दरम्यान, यावरुन संपूर्ण राज्यात आंदोलन केले जात आहे. तर नांदेड जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी युवकाने आत्महत्या  करुन जीवन संपवलं आहे.

मराठा आरक्षणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनात सहभागी असलेल्या युवकाने गळफास घेत आत्महत्या केली आहे. नांदेडच्या हिमायतनगर तालुक्यातील कामारी गावातील ही घटना आहे. सुदर्शन देवराये असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

त्याने समाजाला आरक्षण मिळावे या हेतूने आत्महत्या केल्याचा दावा स्थानिकांनी केलाय. दरम्यान या घटनेनंतर गावातील फोटो आणि व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेयत. सद्या गावात पोलीस दाखल झाले असल्याची माहिती आहे.