जळगाव : शहरातील नवीन बसस्थानक आवारात एका ४० वर्षीय अनोळखी तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव शहरातील नवीन बस स्थानक परिसरात एका ४० वर्षीय अनोळखी तरुणाचा मृतदेह सोमवारी २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आला. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मयताने चॉकलेटी रंगाचे टी शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट परिधान केली आहे. तरी मयताची ओळख पटविण्याचे आवाहन तपासधिकारी पोलीस हेड कॉन्सटेबल महेंद माळी यांनी केले आहे.