शिरपूर : इंदोरकडून गांजाची खाजगी वाहनाद्वारे वाहतूक केली जात असताना शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करीत स्वीप्ट चालक रज्जाक मेगदाद शेख (54, रा.सिंधी कॉलनी, मुलूंड कॉलनी, मुंंबई) व विनोद रमेश शर्मा (33, रा.मुलूंड पश्चिम, मुंबई) यांना अटक केली. ही कारवाई सोमवार, 15 रोजी करण्यात आली. हाडाखेड येथील सीमा तपासणी नाक्यावर नाकाबंदी करण्यात आली. मध्यप्रदेशाकडून शिरपूरच्या दिशेने भरधाव जाणारी मारुती स्विफ्ट डिझायर (एम.एच.03 सी.पी.5863) अडवल्यानंतर चालकाच्या मागील सीटवर पांढर्या पोत्यात गुंडाळलेला गांजा आढळला. त्याचे वजन 19 किलो 700 ग्रॅम भरले असून त्याची बाजारभावानुसार किंमत एक लाख 97 हजार इतकी असून पाच लाखांची काम मिळून सहा लाख 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अन्साराम आगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ, उपनिरीक्षक सुनील वसावे, हवालदार संजय सूर्यवंशी, पवन गवळी, मंगेश मोरे, जाकिर शेख, संदीप शिंदे, सागर ठाकूर, मनोज नेरकर, शिवाजी वसावे, जयेश मोरे, भगवान गायकवाड, कृष्णा पावरा, संतोष पाटील, मनोज पाटील, इसरार फारूकी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.