खान्देशातील प्रवाशांसाठी खुशखबर! भुसावळमार्गे अहमदाबादकडे धावणारी विशेष रेल्वे गाडी सुरु

जळगाव। भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे प्रशासन कोईम्बतूर- भगत की कोठी दरम्यान विशेष ट्रेन सुरु केलीय. ही गाडी भुसावळ, जळगाव स्थानकावरून गुजरातकडे धावणार असलयाने या गाडीचा खान्देशातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

०६१८१ कोईम्बतूर – भगत की कोठी गाडी १४ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत प्रत्येक गुरुवारी कोईम्बतूर येथून पहाटे २.३० वाजता सुटेल. ती तिसऱ्या दिवशी भगत की कोठी येथे सकाळी ११.३० वाजता पोहोचेल. ०६१८२ भगत की कोठी – कोईम्बतूर विशेष गाडी १७ मार्च ते ७ एप्रिलपर्यंत प्रत्येक रविवारी सायंकाळी ७.३० वाजता सुटेल. ही गाडी भुसावळ स्थानकावर दुपारी २ वाजून ४५ पोहोचेल. तर जळगाव स्थानकावर ही गाडी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटाने पोहोचेल.

या स्थानकांवर असेल थांबा
काचीगुडा, नांदेड, पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, सुरत, बडोदा, अहमदाबाद येथे थांबा आहे.

कोच रचना: 4- एसी थ्री टायर कोच, 7- एसी थ्री टायर इकॉनॉमी कोच, 1- स्लीपर क्लास कोच, 4- जनरल सेकंड क्लास कोच, 1- सेकंड क्लास कोच (दिव्यांगजन फ्रेंडली) आणि 1- लगेज कम ब्रेक व्हॅस