खान्देशातील ‘या’ मराठी शाळेत बालकांचे मनोरंजनातून मंत्रिमंडळ स्थापन

नवापूर : येथील सार्वजनिक मराठी प्राथमिक शाळेत शालेय मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले. कार्यक्रमाची कल्पना मुख्याध्यापक महेश पाटील यांनी दिली. या कार्यक्रमाला सर्व सहकारी शिक्षकांनी उत्कृष्ट प्रतिसाद दिला.

सर्व शालेय वातावरणात मतदानासारखी प्रक्रिया राबवून प्रत्येक विद्यार्थ्याला मंत्री होण्याचा अधिकार मिळाला. यावेळी  प्रत्यक्ष मतदान आणि प्रचार याचा उत्कृष्ट अनुभव विद्यार्थ्यांनी आनंदाने घेत सर्व शिक्षकांच्या मदतीने मंत्रिमंडळ स्थापन करण्यात आले.

या मंत्रिमंडळात इयत्ता चौथीतील विद्यार्थी उमेदवारांची निवड करण्यात आली. निवड झालेल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची शपथविधीचा कार्यक्रम करण्यात आला.

यामध्ये धनंजय सागर पाटील (मुख्यमंत्री), अंजली समेल कोकणी (अभ्यास मंत्री), प्रणव सुनील भोई (आरोग्यमंत्री), आरोही सागर गोसावी (स्वच्छता मंत्री), प्रेम दिलीप मावची (क्रीडा मंत्री), शिवानी आनंद भोई (अन्नसुरक्षा मंत्री), दर्शन अशोक जाधव (सांस्कृतिक मंत्री), दक्ष प्रताप ढोले (शिक्षण मंत्री) याप्रसंगी उपशिक्षिका श्रीमती मनीषा भदाणे, योगिता पाटील, माधुरी चित्ते सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.