खारी शंकरपाळी रेसिपी

तरुण भारत लाईव्ह । ३० सप्टेंबर २०२३। संध्याकाळी चहा किंवा कॉफी पिताना सोबत काहीतरी खायला हवं असत. उदा. बिस्किट्स, खारी इ. पण रोज तेच तेच खाण्याचा कंटाळा येतो. मग चहा सोबत खायला काहीतरी वेगळं हवं तर अशावेळी  तुम्ही खारी शंकरपाळी ट्राय करू शकता. खारी शंकरपाळी तुम्ही संध्याकाळी चहा सोबतही खाऊ शकता तसेच स्नॅक म्हणून पण खाऊ शकता. तर खारी शंकरपाळी घरी बनवणार कशी हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

साहित्य
मैदा, ओवा, मीठ, तेल, पाणी.

कृती
सर्वप्रथम, एका बाउलमध्ये मैदा घ्या. यानंतर  ओवा घालावा.  पिठात चवीनुसार मीठ घालून आणि सर्व मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे. या मिश्रणात थोडं  तेल मिक्स करून घ्यावं. पीठ आणि तेल चांगल्या पद्धतीने एकजीव करावं. यानंतर मैद्यामध्ये कोमट पाणी घालावे आणि पीठ मळून घ्यावे. यानंतर स्वच्छ कापडाच्या मदतीने १० – १५ मिनिटांसाठी पीठ झाकून ठेवा.

मळलेल्या पिठाचे तीन भाग करा. यानंतर लाटण्याला थोडेसे तेल लावून शंकरपाळीच्या पिठाची पोळी लाटून घ्या. फिरकीने शंकरपाळ्या पाडून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा. तेल गरम झाल्यानंतर ओव्याच्या शंकरपाळ्या तळून घ्या. चॉकलेटी रंग येईपर्यंत शंकरपाळ्या फ्राय करत राहा. कुरकुरीत आणि गरमागरम शंकरपाळ्या तयार आहेत.