खासदार उन्मेष पाटील ठाकरे गटात प्रवेश करणार; स्मिता वाघ काय म्हणल्या ?

जळगाव : जळगाव लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांना डावलून त्याजागी भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिलेली आहे. त्यामुळे नाराज असलेले खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.

खासदार उन्मेष पाटील यांच्या पत्नी संपदा पाटील यांना उबाठा गटाकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळण्याबाबत जिल्ह्यात जोरदार चर्चा होत आहे. त्यानुषंगाने खासदार उन्मेष पाटील यांच्याशी ठाकरे गटाने संपर्क साधला होता. त्यानुसार खासदार पाटील आज मुंबईत संजय राऊत यांची भेट घेतली.

दरम्यान, नाराज असलेले खासदार उन्मेष पाटील हे ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. अशातच भाजपच्या जळगाव लोकसभेच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत हे उन्मेश पाटील यांचे मित्र असल्यामुळे त्यांची भेट घेण्यासाठी त्यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी उन्मेश पाटील हे गेले आहेत. त्यामुळे मला अजूनही असं वाटत नाही की उन्मेश पाटील हे असा काही निर्णय घेतील.

मी आज प्रचारांमध्ये आहे. त्यामुळे मी अशी कुठली बातमी बघितली नाही. मात्र माझा अजूनही ठाम विश्वास आहे की अशा कुठल्याही घडामोडी घडणार नाहीत. उन्मेश पाटील भाजपमध्येच राहतील, असं स्मिता वाघ म्हणाल्या.

खासदार उन्मेष पाटील उद्या ठाकरे गटात प्रवेश करणार !
सूत्रानुसार, खासदार उन्मेष पाटील हे उद्या ३ रोजी दुपारी १२ वाजता ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.