सागर निकवाडे
नंदुरबार : जिल्ह्यातील धडगाव येथे आज गुरुवारी शिवसेनेचा आदिवासी मेळावा पार पडला. अध्यक्षस्थानी शिवसेना नेते तथा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार हे उपस्थित होते. यावेळी हेलिकॅप्टर पाहण्यासाठी लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती. कुतहलाने हेलिकॉप्टरकडे पाहणाऱ्या चिमुकल्यांना खासदार श्रीकांत शिंदे यांनी हेलिकॉप्टरची सफर घडवली. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीमुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून आले.
खासदार डॉ. श्रीकांत शिंदेसह मंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार हे आज गुरुवारी धुळे, नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आले होते. सातपुड्याच्या दुर्गम भागात सभा असल्याने डॉ.खासदार श्रीकांत शिंदे आणि मंत्री दादा भुसे, मंत्री अब्दुल सत्तार हे सभेच्या ठिकाणी हेलिकॉप्टरने दाखल झाले होते. यावेळी आदिवासी भागात हेलिकॉप्टर आल्याने हेलिकॅप्टर पाहण्यासाठी लहान मुलांनी मोठी गर्दी केली होती. कुतहलाने हेलिकॉप्टरकडे पाहणाऱ्या चिमुकल्यांवर खासदार श्रीकांत शिंदे यांचे लक्ष गेले. त्यांनी आपल्या अंगरक्षकांना आणि उपस्थित शिवसैनिकांना त्या चिमुकल्यांना आपल्याकडे आणण्यास सांगितले.
त्या लहान मुलांना हेलिकॉप्टरमध्ये बसून आकाशातून हेलिकॉप्टरची फेर फटका मारून आणला. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या या कृतीमुळे लहानग्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून आले. दुर्गम भागातील मुलांना भविष्यात हेलिकॉप्टरचा प्रवास कधी मिळेल. आज त्यांना खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंमुळे हेलिकॉप्टर सफारी करता आली. ही चर्चा मेळाव्यासाठी जमलेल्या हजारो आदिवासी बांधवांमध्ये होती. आपल्या सध्या राहणीमुळे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सर्वांचे मन जिंकून घेतले.