नंदूरबार : काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांची “भारत जोडो यात्रा” आज जिल्ह्यात होत आहे. दरम्यान, खासदार डॉ. हिना गावित यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केलीय.
काय म्हणाल्या डॉ. हिना गावित ?
जिल्ह्यातील आदिवासींचे पाहिजे तसा विकास झाला नाही. यामुळे २०१४ ला जिल्ह्यातील मतदारांनी भाजपाला मतदान केले. यामुळे मागील ४० वर्ष राज करणाऱ्यांनी आता आदिवासींच्या न्यायसाठीच्या गप्पा मारू नये, असा टोला लगावला आहे.
शिवाय या भारत जोडो न्याय यात्रेकडे जिल्ह्यातील नागरिकांनी पाठ फिरवली असल्याचा आरोप खासदार डॉ. हिना गावित यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यातील गोरगरीब नागरिकांनी काँग्रेस पक्षाला ४० वर्षपर्यंत मत देऊन सत्तेत आणले. मात्र त्यांचा हवा तसा विकास केला नसल्याचा आरोप देखील खासदार गावित यांनी केला आहे.
राज्यात असलेल्या महायुतीला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला ४५ प्लस येणार असल्याचे विश्वास भाजप राष्ट्रीय प्रवक्त्या तथा खासदार डॉ. हिना गावित यांनी व्यक्त केले आहे.