---Advertisement---

खिचडी चोर जळगावच्या दौऱ्यावर ; उद्धव ठाकरेंवर नितेश राणेंची सडकून टीका

---Advertisement---

जळगाव । शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्याहस्ते सरदार वल्लभभाई पटेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या जळगाव दौऱ्यावर भाजपचे आमदार नितेश राणेंनी सडकून टीका केलीय.

राज्यातील सर्वात मोठा दरोडेखोर, खिचडी चोर जळगावच्या दौऱ्यावर आहे. प्रशासनाने आदेश देऊन ही शेंबड्या मुलासारखे नाक रगडायला जळगावला गेले आहेत. स्वतःचे कार्यक्रम बंद झाल्याने दुसऱ्याचं काय चाललंय यावर त्यांचे कार्यक्रम चालतात असं नितेश राणे (Nitesh Rane) म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीला प्रोटोकोल कळत नाही. मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना बघितलं पण नाही आणि हल्ली शेतकऱ्यांच्या बांधावर गेले होते. ते पावसात भिजले होते की राऊत ने बिसलेरी ओतलेली हे त्यांनाच माहिती, असंही नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment