भुसावळ : रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता बडनेरा ते नाशिक मेमू रेल्वेला आठऐवजी १२ डबे जोडण्यात आले आहेत. याची अंमलबजावणी रविवार, दि. ९ पासून करण्यात आली आहे.
ही गाडी बडनेरा येथन सकाळी ११:०५ वाजता सुटते आणि नाशिकला १९:३० वाजता पोहोचते आणि त्याच दिवशी नाशिक येथून २१:१५ वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ४:३५ वाजता बडनेरा येथे पोहोचते.
या मेमू रेल्वेने प्रवाशांसोबत आणि व्यावसायिक यांच्या मोठ्या प्रमाणात प्रवास असतो. प्रवाशांची संख्या पाहता आता रेल्वे प्रशासनाने डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी रविवार, दि. ९ जूनपासून सुरू करण्यात आली आहे.
क्र. ०१२११/१२ ही बडनेरा ते नाशिक मेम् ही गाडी सुरुवातीला ८ डब्यांची होती. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी तसेच दररोजच्या प्रवाशांना उत्तम सेवा सुविधा देण्याच्या उद्देशाने भुसावळ रेल्वे विभागाने रविवार, दि. ९ जूनला चार डबे वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.