मुंबई : दागिने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोन्या आणि चांदीच्या किमतींनी मारलेल्या उसळीने सर्वांनाच घाम फुटला होता. मात्र, आता त्यात काहीशी घसरण होताना दिसत आहे. ज्यामुळे सर्वसामान्य खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. या आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या किमतीत घसरण नोंदवली गेली आहे. मात्र, MCX वर दोन्ही धातूंच्या दरात वाढीसह व्यावर होत आहे.
काय आहे आजचा नवीनतम दर?
गुडरिटर्न्स वेबसाईटवरील उपलब्ध माहितीनुसार आज, १७ मे रोजी सोन्याच्या भावात जवळपास ५०० रुपयांनी घट झाली आहे. २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ४५० रुपयांनी घसरून कालच्या तुलनेत ५६,३०० रुपयांवर पोहोचले आहे, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९० रुपयांनी कमी होऊन ६१,४२० रुपये प्रति १० ग्रॅमवर घसरले आहे. उल्लेखनीय आहे की सोन्याच्या दरात चढउतार होऊनही सर्वसामान्यांना शुद्ध सोने खरेदीसाठी प्रति ग्रॅम ६१ हजार रुपये मोजावे लागणार आहेत. दुसरीकडे, आज चांदीची किंमतही ५०० रुपयांनी कमी होऊन ७५,१०० रुपयांवर घसरली आहे.
MCX वर सोने-चांदीची दरवाढ
देशांतर्गत वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. एमसीएक्सवर सोन्याचा दर सुमारे १३० रुपयांनी वाढून ६०,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असताना चांदीही ५० रुपयांनी महागली आहे. एमसीएक्सवर चांदीचा दर ७२,६०० रुपये प्रति किलो पार पोहोचला असून कमोडिटी मार्केटमध्ये किमती वाढण्याचे कारण जागतिक संकेत आहेत.