जळगाव : सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मागील काही दिवसापासून सोने दरात वाढ दिसून आली मात्र शनिवारी (दि. ८) एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी घसरले.
यामुळे जळगावच्या सुवर्णपेठेत सोने ७१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले. चांदीच्या भावातही ६०० रुपयांची घसरण होऊन ती ९२ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली आहे.
या महिन्याच्या सुरुवातीलाच १ जून रोजी सोन्याच्या भावात ४०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार २०० रुपये प्रतितोळ्यावर पोहोचले होते. त्यानंतर त्यात घसरण होत गेली. गुरुवारी (दि. ६) त्यात पुन्हा ७०० रुपयांची वाढ होऊन ते ७३ हजार १०० रुपयांवर पोहोचले. ७ रोजी त्यात २०० रुपयांची घसरण होण्यापाठोपाठ ८ रोजी थेट एक हजार ४०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे सोने ७१ हजार ५०० रुपये प्रतितोळ्यावर आले. दुसरीकडे दोन दिवसांत तीन हजार ६०० रुपयांची वाढ झालेल्या चांदीच्या भावात शनिवारी (दि. ८) ६०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदी ९२ हजार २०० रुपये प्रतिकिलोवर आली.